प्रेषित यूनुस यांच्या कथेतील 4 धडे.


 

प्रेषित यूनुस यांच्या कथेतील 4 धडे.


1: आपले पाप ओळखा आणि क्षमा मागा.

जेंव्हा मासा समुद्राच्या तळाशी आला तेव्हा प्रेषित युनुस यांना आपली चूक लक्षात आली, तेव्हा त्यांनी माशाच्या पोटातच डोके खाली टेकवले आणि ईश्वराकडे क्षमायाचना केली.


2: ईश्वराच्या दयेपासून निराश होऊ नका.

त्यांनी त्यांच्या दुर्दैवावर शोक केला नाही आणि धीर सोडला नाही.

त्याऐवजी, त्यांनी आपले हात ईश्वराच्या दिशेने वर उचलले.


" आम्ही त्याला प्रतिसाद दिला, आणि त्रासापासून वाचवले. अशाप्रकारे आम्ही विश्वास ठेवणाऱ्या लोकांची मदत करतो." (कुरआण 21:88)


3: सत्याकडे आमंत्रित करण्याच्या कार्यामध्ये संयमाचे महत्व.

आपल्या प्रयत्नांची फळे मिळण्यासाठी वेळ लागेल. हे पण शक्य आहे की आपले मित्र मंडळी किंवा

कुटुंबतील सदस्य ही सत्य स्वीकारनार नाहीत,  जरी आपण बर्‍याच वर्षांपासून त्यांच्यापर्यंत संदेश पोहचवत आहोत.

याचा अर्थ असा नाही की तुम्ही निराश होऊन आपले कार्य बंद करावे.


4:  स्मरण ( ईश्वराची आठवण) आणि प्रार्थना (ईश्वराला मदत मागणे) ही तुमची सर्वात शक्तिशाली साधने आहेत.

प्रेषित युनुस यांच्या लक्षात आले की, समुद्राच्या तळाशी राहणारे जीव, प्राणी हे सुध्दा ईश्वराची स्तुती करतात.

आणि हे ईश्वराचे स्मरण आणि प्रार्थना यांच्या महत्वाची आठवण करून देतात.


आपण ईश्वराच्या आज्ञेचे कितीही उल्लंघन केले, तरीसुध्दा खरा पश्चाताप आणि तपश्चर्या आपल्याला ईश्वराच्या कृपेस पात्र ठरवतील. आणि तोच आपल्या पापांना क्षमा करतो आणि आपल्याला अडचणीतून मुक्त करतो.

Comments

Popular posts from this blog

इस्लाम मध्ये युद्ध