Posts

Showing posts from July, 2020

आपण ईश्वरावर प्रेम केले पाहिजे की ईश्वराचे भय बाळगले पाहिजे?

आपण ईश्वरावर प्रेम केले पाहिजे की ईश्वराचे भय बाळगले पाहिजे? प्रश्न: आपण ईश्वरावर प्रेम केले पाहिजे किंवा ईश्वराचे भय बाळगले पाहिजे? माझा विश्वास आहे की, भीती ही ईश्वराचे आज्ञापालन करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. *************** उत्तरः अरबी शब्द "तकवा" हा सहसा "भीती" म्हणून चुकीचा अनुवाद केला जातो. मूळ शब्द "वाव काफ या"  हे प्रेमास एकरूप करते.  आपण प्राणी, भूत किंवा वाईट लोकांना घाबरतो तसे ईश्वराचे भय बाळगू नये. ईश्वरावर प्रेम केले पाहिजे. जेव्हा एखाद्यावर प्रेम मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा एक भीती निर्माण होते, परंतु ही भीती काही भयानक गोष्टींमुळे नसते तर ती अत्यंत प्रेमळपणामुळे असते.  ही भीती आपल्याला ज्यांच्यावर प्रेम आहे त्याच्या आज्ञा मोडण्यापासून प्रतिबंध करते.   ही जी प्रेमाची / भीतीची भावना आहे त्याला "तकवा" म्हणतात ज्याची शिफारस कुरअाण करते. "..... जे श्रद्धावान आहेत - त्यांना अल्लाह सर्वाधिक प्रिय आहे ...."  कुरआन २:१६५ कुरआन असे म्हणतो, विश्वास ठेवणारा (श्रद्धावान) ईश्वराचे खूप स्मरण करतो.  त्याचबरोबर  कुरआन विश्वास ठेवणाऱ

पारलौकिक जिवणाशिवाय मानवता असू शकते का?

पारलौकिक जिवणाशिवाय मानवता असू शकते का? " वास्तविक, माझा मानवतेवर विश्वास आहे. आणि धर्मावर नाही" ******************* अ : मानवता - परलोकावर विश्वास न ठेवता? 'माझा मानवतेच्या धर्मावर विश्वास आहे'. 'आधी चांगला माणूस व्हा आणि मग व्हा ...... ' 'स्वर्ग / नरक कोणी पाहिले आहे?  मग आपण यावर विश्वास का ठेवला पाहिजे? ' जेव्हा जेव्हा परलोक/ श्रद्धा / ईश्वर या मुद्द्यावर बोलले जाते  तेव्हा आपल्याला असे वाक्प्रचार ऐकायला मिळतात. जे असे वक्तव्य करतात त्याच्यासमोर कदाचित देव आणि परलोक यांची खरी कल्पना मांडली गेली नसावी.  जेव्हा कोणतीही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित वस्तू देव मानली जाते, तेव्हा कोणत्याही तार्तिक किंवा तर्कसंगत व्यक्तीला श्रद्धेची व ईश्वराची ही संकल्पना मान्य असणार नाही.  “माझा मानवतेवर विश्वास आहे.” मानवता म्हणजे काय? मानवी किंवा अमानवीय काय आहे हे कोण ठरवेल? नैतिकता किंवा अनैतिकतेचे मापदंड काय असेल हे कोण ठरवेल?  दरोडेखोरांना असे वाटेल की लोकांच्या मौल्यवान वस्तू लुटून तो स्वत: साठी आणि आपल्या कुटूंबासाठी कायदेशीर कमाई करतो त्यावर त्