आपण ईश्वरावर प्रेम केले पाहिजे की ईश्वराचे भय बाळगले पाहिजे?

आपण ईश्वरावर प्रेम केले पाहिजे की ईश्वराचे भय बाळगले पाहिजे?


प्रश्न: आपण ईश्वरावर प्रेम केले पाहिजे किंवा ईश्वराचे भय बाळगले पाहिजे? माझा विश्वास आहे की, भीती ही ईश्वराचे आज्ञापालन करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे.
***************

उत्तरः अरबी शब्द "तकवा" हा सहसा "भीती" म्हणून चुकीचा अनुवाद केला जातो. मूळ शब्द "वाव काफ या"  हे प्रेमास एकरूप करते.  आपण प्राणी, भूत किंवा वाईट लोकांना घाबरतो तसे ईश्वराचे भय बाळगू नये. ईश्वरावर प्रेम केले पाहिजे.

जेव्हा एखाद्यावर प्रेम मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा एक भीती निर्माण होते, परंतु ही भीती काही भयानक गोष्टींमुळे नसते तर ती अत्यंत प्रेमळपणामुळे असते. 

ही भीती आपल्याला ज्यांच्यावर प्रेम आहे त्याच्या आज्ञा मोडण्यापासून प्रतिबंध करते.   ही जी प्रेमाची / भीतीची भावना आहे त्याला "तकवा" म्हणतात ज्याची शिफारस कुरअाण करते.

"..... जे श्रद्धावान आहेत - त्यांना अल्लाह सर्वाधिक प्रिय आहे ...."  कुरआन २:१६५

कुरआन असे म्हणतो, विश्वास ठेवणारा (श्रद्धावान) ईश्वराचे खूप स्मरण करतो. 

त्याचबरोबर  कुरआन विश्वास ठेवणाऱ्यास प्रोत्साहित किंवा आग्रही करतो - हे ही सामान्यतः ईश्वराचे "भय"  म्हणून भाषांतरित केले जाते. कृपया लक्षात घ्या की वेगवेगळ्या अरबी शब्दांचे अर्थ भिन्न आहेत परंतु ते सामान्यतः एकच शब्द "भय" म्हणून अनुवादित केले जातात. 


तर - ईश्वराशी "अत्यंत प्रेम" आणि ईश्वराची "भीती" असणे कसे एकत्र होऊ शकते?

"ईश्वराची भीती" म्हणजे ती भीती नव्हे, जी आपल्याला प्राणी, भूत, अग्नी, बुडून जाणे, इत्यादी साठी वाटते. "ईशभय" हा ईश्वरावरील अति प्रेमाचा परिणाम आहे. 

जेव्हा आपण ईश्वरावर इतके प्रेम करतो की एक प्रकारचे "भय" विकसित होते आणि म्हणून आपल्याला ईश्वराला नाराज करणे कठीन वाटते. अशाप्रकारची भीती इस्लाम मध्ये अपेक्षित आहे.


ईशभय हा ईश्वराप्रती असलेल्या नितांत प्रेमाचाच भाग आहे.
 
कुरआन भीतीवर आधारित आज्ञाधारकतेच्या तत्वज्ञानाचे पालन करीत नाही. कुरानिक दृष्टिकोन पुढील  पायऱ्यानुसार आहेः


1. ईश्वराच्या संकेताच्या माध्यमातून जाणे.

२. ईश्वराचे संकेत विचारात घ्यावे. - जे सर्वत्र उपस्थित आहेत.

3. जर एखाद्याला  ईश्वराच्या संकेताची खात्री पटली असेल आणि त्याने  अंतिम निर्मात्यावर विश्वास ठेवला असेल तर त्याने/तिने ईश्वरावर दृढ  विश्वास ठेवला पाहिजे.

4. ईश्वरावर विश्वास ठेवण्यामध्ये ईश्वराच्या नियमांवर/ कायद्यावर विश्वास ठेवणे देखील समाविष्ट आहे.  आपण आपल्या रोजच्या जीवनात याच कायद्याने वागतो. आपल्याला कुरआन आणि परिसरामुळे ईश्वराच्या या नियमांचे ज्ञान प्राप्त होते.

5. त्यानंतर पायरी येते कृतीची. कृती ईश्वरावरील श्रद्धा आणि प्रेमावर अवलंबून असते. एक आस्तिक (श्रद्धावान) सर्वशक्तिमान ईश्वरावर जितका प्रेम करतो तितक्याच प्रेमाने तो ईश्वराच्या आज्ञा पाळतो.

6. ईश्वरावरील अतीप्रेम एक प्रकारचे ईशभय निर्माण करते. एका श्रद्धावान व्यक्तीने ईश्वराची आज्ञा न मानण्याच्या  भीतीने दुष्कृत्यापासून दूर राहिले पाहिजे.


थोडक्यात - कुरआन तर्क, प्रेम आणि आज्ञाधारकतेवर आधारित विश्वासाची आज्ञा देतो.

*************

Comments

Popular posts from this blog

इस्लाम मध्ये युद्ध