ईश्वर एक आहे; अनेक नाही - पंडित श्री राम शर्मा आचार्य

 * ईश्वर एक आहे; अनेक नाही. * पंडित श्री राम शर्मा आचार्य


[हिंदू धर्माचा एक महान अधिकार आणि गायत्री परिवारीचा संस्थापक]



      

 या विश्वाचा निर्माता फक्त एक आहे. 

 केवळ तोच आहे, जो उत्पादन, प्रसार, किंवा भिन्नता या सर्व प्रक्रिया आपल्या योजनेनुसार पूर्ण करतो. 

त्याचा कोणी साथीदार किंवा मदत करणारा नाही.


सर्वांचा स्वार्थ एकत्र आहे. एकाच ईश्वराची सत्ता वेगवेगळ्या प्रकारची झाली आणि असे समजण्यात येऊ लागले, जे ज्या देवी देवतांची पूजापाठ करतील ते त्याच देवाला आपले समजतील आणि त्याचेच समर्थन करतील.


 एका ईश्वराचे राज्य वेगवेगळ्या देवांमध्ये ठरविले गेले आणि लोक असे विचार करू लागले की ते आपल्या स्वत:च्या निवडलेल्या देवाची उपासना आणि समर्थन करतील.

आणि ते येथेच थांबले नाहीत, जे लोक त्यांच्या देवांना मान्य करणार नाहीत किंवा त्याच्या विरोधात असतील त्यांना त्रास देण्याचे समर्थन केले. 

 ही मान्यता आहे आजच्या बहुदेववादाची.

 अशाप्रकारे केवळ सृष्टी चा निर्माता अनेक गटात विभागला गेला नाही तर, प्रत्येक वंश, गाव आणि शहर यांचे सुध्दा वेगवेगळे देवी देवता झाले. आणि ईश्वराचीही वाटणी झाली.

अनेकजण स्वतः देवी देवता म्हणून उभे राहिले. 

आणि त्यांचा आकारच नाही तर स्वभावही असा झाला की, त्यांची उपासना न करता दुसऱ्याची उपासना करणाऱ्याला त्यांनी क्रोधी होऊन त्रास देण्यास सुरूवात केली.


बहुदेवतेच्या सुरुवातीच्या काळात, तेथे फक्त तीन देव होते: ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि त्यांच्या बायका - सरस्वती, लक्ष्मी आणि काली. त्यानंतर, दररोज नवीन देवता अस्तित्त्वात येऊ लागले. आणि देवी देवतांची संख्या अगणित वाढली. त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि आश्चर्यकारक इच्छा देखील वाढत गेल्या. त्यापैकी काही शाकाहारी, तर काही मांसाहारी होते. आणि काही अत्यंत क्रोधी तर काही शांत स्वभावाचे होते. 

काहीतर भुत, प्रेत आणि पूर्वज देखील देवी-देवता बनले, आणि त्यांची संख्या हजारो लाखोंपर्यंत वाढली. 


या संदर्भात मागासवर्गीयांनी मोठ्या आवेशाने देवाची निर्मिती केली. आणि त्यांचा असा विश्वास होता की या देवतांच्या क्रोधामुळे शारीरिक आणि मानसिक रोग होतात. आणि अशा सर्व आजारांवर उपचार करण्यासाठी काही मध्यस्थ 'ओझा' (धार्मिक डॉक्टर) असतो आणि यांचे शुल्क (लाच) माहिती करून घेणे.


बर्‍याचदा या उपचारात खाद्यपदार्थांचा वापर केला जात असे. विशेषत: प्राणी व पक्ष्यांच्या बळी ची मागणी होत असे.  त्यांनी ठरवलेल्या विशिष्ट ठिकाणी जाऊन या वस्तू चढावा म्हणून दिल्या जात असे.


जिथे जिथे नवीन

सून घरात प्रवेश करते किंवा नवीन बाळ जन्माला आले, तर त्या कुटुंबातील कुलदैवतला भेट देणे हे सुध्दा आवश्यक मानले जात असे. त्याचप्रमाणे कुलदैवतला प्रसन्न करणे हे देखील कुटुंबासाठी आवश्यक बनले. हे  निम्न गटातील जाती/ जमातीचे महत्वाचे वैशिष्ट्य बनले. 


समाजातील उच्च वर्गामध्ये देवता तुलनेने जास्त प्रतिष्ठित आणि आदरणीय होते. श्रीमंत लोकांचा असा विचार होता की या सर्वोच्च देवतांचे उपासक होण्यात त्यांची प्रतिष्ठा आहे.


पंडित, पुरोहित (धार्मिक अधिकारी) या उच्च देवतांची उपासना संबंधित विधी करीत असत. दुर्गा सप्तशती पाठ, शिव महिमा, रुद्री इत्यादी पाठ, हवन(पूजा संबंधित विधी), पूजन या गोष्टींचा शोध लागला. बहुदेवतेसह, अनेक कथा आणि आख्यायिका जोडल्या गेल्या.

 कित्येक कथा रचल्या गेल्या आणि त्यातून लोकांना या देवतांची उपासना करण्याचे फायदे आणि या देवतांची उपासना केली नाही तर त्यांचा क्रोध आणि नुकसान सहन करावे लागेल, अशी प्रथा रूढ झाली.


असंख्य देवतांचा संबंध सण उत्सवाशी जोडला गेला. या देवतांना स्थानांना भेटी देणे अनिवार्य करण्यात आले. यापैकी काही जुने देवता म्हणून राहिले आणि कित्येक नवीन निर्माण झाले. अनेक जुन्या देवता विस्मृतीत गेल्या आणि अनेक नवीन अस्तित्त्वात आल्या आणि प्रसिद्ध झाल्या.


तर्कशक्ती आणि  बुद्धीच्या आधारे, ईश्वर एक आहे हे स्वीकारणे अपरिहार्य आहे.


 ईश्वराचे अस्तित्व, त्याचे गुण आणि त्याचे कायदे वेगवेगळ्या पंथांच्या / संप्रदायाच्या इच्छेनुसार असू शकत नाहीत. त्यांचा स्वतःचा विश्वास हा त्यांची वैयक्तिक बाब आहेत.


सर्वशक्तिमान शक्ती ही निराकार असावी. ज्याचा काही आकार असेल तर तो फक्त काही क्षेत्रात आणि मर्यादीत असेल.


आणि वेद असे म्हणतात,   “न तस्य प्रतिमा अस्ति"  ( यजुर्वेद 32:3) "त्याची कोणतीही प्रतिमा नाही."  म्हणजे त्याला कोणतीही मूर्ती/ आकार/ स्वरुप नाही. 


अशाचप्रकारे एका ठिकाणी असे म्हटले आहे  “एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति”  ( ऋग्वेद 1: 164: 46) म्हणजे एकाच ईश्वराला विद्वानांनी  अनेक प्रकारे संबोधले आहे.


अखेरीस - सृष्टीच्या निर्मितीमध्ये आणि व्यवस्थेमध्ये भागीदारी करणारे, स्वतंत्र अस्तित्वाच्या खोट्या देवी देवतांकडे दुर्लक्ष करून सत्याचा स्वीकार करण्यामध्ये खरी विवेकशिलता आहे.

        ************

Source: Hindi to English translation of the below content.
****************************************************************

Comments

Popular posts from this blog

इस्लाम मध्ये युद्ध