सूर्य आणि चंद्र लाभदायक आहेत म्हणून आपण त्याची उपासना करू शकतो का?

सूर्य आणि चंद्र लाभदायक आहेत म्हणून आपण त्याची उपासना करू शकतो का?
*************

 भिन्न परिस्थितीसाठी वर्तनाचे/ स्वभावाचे वेगवेगळे शब्द आणि प्रकार आहेत. 

आदर, प्रेम, आपुलकी, सादरीकरण, प्रशंसा, कौतुक - भिन्न परिस्थितींसाठी  अशाप्रकारे अनेक शब्द वापरले जातात.

आपण आपल्या पालकांचा आदर आणि त्यांच्यावर प्रेम करतो.

आपण एखाद्या क्रिकेटपटूची किंवा एखाद्याच्या शौर्याच्या कृत्याची प्रशंसा करता. परंतु ते आपल्या पालकांची जागा घेऊ शकत नाहीत.आपण आपल्या पालकांवर ज्याप्रकारे प्रेम करता तसे आपण त्यांच्यावर प्रेम करू शकत नाही.

आपण आपल्या जोडीदारावर प्रेम करता परंतु आपण आपल्या शेजाऱ्यावर त्याचपरमाणे प्रेम नाही करु शकत.

तुम्ही देवाला शरण जा. आपले संपूर्ण आयुष्य देवाच्या मार्गदर्शनानुसार चालले पाहिजे.

ईश्वराची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही.

आपण प्राण्यांबद्दल आपुलकी दाखवतो, पण ही आपुलकी आपल्या मुलांप्रती असनाऱ्या आपुलकी पेक्षा निश्चित वेगळी आहे.

आपण फुले, पक्षी, आकाश, महासागर, पर्वत, सूर्य, चंद्र इत्यादींच्या सौंदर्याचे कौतुक करता. या सर्व गोष्टी पुरावा आहेत त्या उत्कृष्ठ निर्मात्याचा ज्याला आपण ईश्वर/देव मानतो.

फिरणारे आणि परिभ्रमण करणारे ग्रह, आकाशगंगा आणि अवाढव्य ब्रह्मांड आपल्या निर्मात्याचे मोठेपण प्रकट करतात.

तर - कोण कौतुकास पात्र आहे? आणि कोण उपासनेस पात्र  आहे?

निश्चितच सूर्य, चंद्र, तारे या सर्व सृष्टीची निर्मिती करणारा आणि आपलीही निर्मिती करणारा एकमेव तो ईश्वर आहे.

आपण त्याच सर्वशक्तिमान ईश्वराची उपासना केली पाहिजे आणि त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केले पाहिजे कारण एकमेव ईश्वरानेच आम्हाला आई, वडील, जोडीदार, फुले, पक्षी, चंद्र, तारे इ. दिले आहे.

आपण घेत असलेला प्रत्येक श्वास   देवानेच दिला आहे.

जेव्हा आपण आपल्या पालकांवर आणि आपण आजूबाजूस पाहत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करतो  पण याचे सर्व श्रेय हे त्या निर्मात्याला दिले पाहिजे. आणि तोच आपल्या प्रत्येक आनंदामागील वास्तविक कारण आहे - त्या निर्मात्याला - आपल्या सर्वोच्च स्वामीला मान्य करण्यास तयार नसणे, त्यांच्याप्रती कृतज्ञ नसणे हे न्याय्य नाही.

 सूर्य, चंद्र, फुले, निसर्ग आणि सर्व गोष्टी एक संतुलित कायद्याअंतर्गत चालत आहेत. आणि उपासना फक्त ईश्वराची व्हायला हवी जो सर्वांचा निर्माता आहे.

Comments

Popular posts from this blog

इस्लाम मध्ये युद्ध